जयहिंदच्या रासेयोतर्फे दत्तक गाव रानमळा येथे आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:55+5:302021-06-17T04:24:55+5:30
शिबिरात नुकत्याच वयात आलेल्या मुली, प्रौढ महिला आणि पुरुषांच्या रक्ताचे नमुने जमा करून त्यातील हिमोग्लोबिन, तांबड्या व पांढऱ्या पेशींचे ...

जयहिंदच्या रासेयोतर्फे दत्तक गाव रानमळा येथे आरोग्य शिबिर
शिबिरात नुकत्याच वयात आलेल्या मुली, प्रौढ महिला आणि पुरुषांच्या रक्ताचे नमुने जमा करून त्यातील हिमोग्लोबिन, तांबड्या व पांढऱ्या पेशींचे प्रमाण, किडनी व रक्तातील इतर प्रादुर्भावाची तपासणीसाठी जवळपास ३०० ग्रामस्थांचे रक्ताचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करून दुसऱ्या दिवशी नागरिकांना त्यांचे अहवाल देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान रानमळाचे सरपंच प्रवीण पवार होते. याप्रसंगी उपसरपंच तान्हूबाई गावडे, रवी मालशिकरे, आशा बैसाने, रोहिणी खर्चे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. पवार, डॉ.डी.के. पाटील आणि डॉ.वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रशांत कसबे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.योगिता पाटील, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.प्रतीक शिंदे आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.