्र१३१ वर्ष जुन्या पुलावरून धोकेदायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:31 IST2020-02-05T12:31:13+5:302020-02-05T12:31:55+5:30
ब्रिटीशकालीन मोठा पूल मोगलाईतील पुलाचे कठडे तुटले काजवे पुलाची दुरूस्ती मात्र पथदिवे नाहीत

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पांझरा नदीवर तब्बल नऊ छोटे-मोठे पूल असून, त्यापैकी ब्रिटीशकालीन १३१ वर्ष जुना मोठा पूल जवळपास जीर्ण झाला असल्याने यावरून आजही धोकेदायक वाहतूक सुरू आहे. या पुलावरील अवजड वाहतूक दहा वर्षापुर्वी बंद करण्यात आली आहे़ मात्र नियम धाब्यावर बसत सध्या सर्रापणे या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले़
पांझरा नदीवर १८८९ मध्ये ब्रिटीश शासनाने वाहतुकीसाठी मोठा पूल दगडाने तयार केला होतो़ या पुलाला शंभर वर्षेपूर्ण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या गुणवत्ता अहवालात हा पूल अवजड वाहतुकीस धोकेदायक असल्याचा निष्पन्न झाले आहे़ या पुलावरील अपघात टाळण्यासाठी १० वर्षापूर्वी या पुलावरील अवजड वाहतूक थांबविण्यात आली आहे़ हा पूल धोकेदायक व अवजड वाहतुकीस बंद असल्याबाबत कोणतीही सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेली नाही़ त्यामुळे आजही या पुलावरून सर्रापणे अवजड वाहतूक सुरूच आहे़
अन्य पुलांचीही दुरवस्था
पांझरा नदीवर नऊ पुलापैकी दोन सार्वजनिक बांधकाम विभाग काही खाजगी, चार पुल मनपाच्या अंतर्गत येतात. त्यापैकी चार पूल वाहतुकीस धोकेदायक ठरत असतांना मनपाकडून दुरूस्तीसाठी कोणत्याही प्रकारची तसदी घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
देवपूरातील गणपती पुल
महापुरामुळे संतोषी माता चौक ते देवपूर भागाला जोडणारा गणपती पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहे़ तर पथदिव्यांचे खांब ही पाण्यात वाहून गेले आहेत़ शाळा, महाविद्यालय, दवाखान्यात जाण्यासाठी हा पूल महत्वाचा असतांना देखील अद्याप या पुलाची दुरूस्ती झालेली नाही़
पांझरेवरील परशी पुल
चौपाटीजवळ असलेला परशी पुलाजवळ धोकेदायक विहीर आहे़ तसेच हा पूल खालून खलचा आहे़ तर मोगलाईतील ब्रिजकम बंधारा पुलाचे कठडे तुटले असून त्याठिकाणी पथदिवे नाहीत़ सिंधी कॉलनी व नकाणे गावाला जोडणाऱ्या पुलावर खड्डे व काही पथदिवे बंद पडले आहेत़ याच नदीवरील काजवे पुलाची दुरूस्ती मनपाकडून करण्यात आली़ अद्याप या पुलावर पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत़ त्यामुळे नागरिकांनी रात्री पुलावरून वाहतूक करतांना अडचण येते़
एकवीरा देवी पूल
श्री़एकविरा देवी मंदिर ते जुने धुळे भागाला जोडणार पुलावर स्थिती अद्याप चांगली असली तरी पथदिवे बंद आहेत़ याठिकाणी भाविकांची तसेच जवळच मंगल कार्यालय असल्याने वर्दळ असते़ महिलांची सुरक्षितेच्या दृष्टीने पथदिवे दुरूस्तीची गरज आहे़