या फरार ९४ आरोपींना आपण पाहिलंत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST2021-09-15T04:42:04+5:302021-09-15T04:42:04+5:30

खून, दरोडा, जबरी लूट असो वा अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येते. संशयावरून ...

Have you seen these 94 absconding accused? | या फरार ९४ आरोपींना आपण पाहिलंत का?

या फरार ९४ आरोपींना आपण पाहिलंत का?

खून, दरोडा, जबरी लूट असो वा अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येते. संशयावरून काही जणांना ताब्यात घेण्यात येते. तर काहींची नावे स्पष्टपणे समोर आल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होत असते. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते. तरीही संशयित मिळून येत नसल्याने हा आरोपी फरार असल्यावर शिक्कामोर्तब केले जाते. असे जिल्ह्यात ९४ आरोपी आजही फरार असल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी आहे.

बऱ्याच वर्षांपासून

आरोपी सापडेना

- गेल्या बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

- घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येतो. मुदतीत संशयित सापडत नसल्याने फरार घोषित होते.

- तत्पूर्वी संबंधित आरोपीला फरार घोषित करण्यापूर्वी तपासाचे वेगवेगळे सोपस्कार पार पाडणे पोलिसांना बंधनकारक आहे.

- फरार असलेल्या आरोपीसंदर्भात गुन्ह्याची तीव्रतादेखील महत्त्वाची असते. गुन्ह्यानुसार आरोपीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो.

मृत्यूनंतरही तपास होऊ शकतो

एखाद्या प्रकरणात फरार असलेला संशयित मृतावस्थेत सापडल्यानंतर लागलीच हे प्रकरण फाईलबंद होत नसते. त्यासाठीदेखील वेगवेगळे तपास कामांचे सोपस्कार पोलिसांना पार पाडावे लागतात. वरिष्ठांची मदत घेण्यात येते. केवळ त्या एका व्यक्तीपुरता प्रकरणाचा तपास थांबविता येत नाही.

- घटना घडल्यानंतर बऱ्याच प्रकरणांत थोड्या फार दिवसांच्या फरकाने संशयित गजाआड करण्यात येत असतात. त्यात काहींना जामीन मिळतो तर काहींना जामीन नाकारण्यात येतो. पण, गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार संशयित कुठेतरी पळून गेलेले असतात. त्यांचा वेळोवेळी तपास सुरू असतो. सध्या जे आरोपी फरार आहेत त्यांचा तपास लावण्याच्या सूचना संबंधितांना वेळोवेळी देण्यात येत असतात.

- प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक

Web Title: Have you seen these 94 absconding accused?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.