सोशल मीडियावरही महिलांचा छळ, सायबरकडे ०४ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:14+5:302021-07-23T04:22:14+5:30

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक - मुळात म्हणजे महिला या सोशल मीडियाचा वापर हा कमीत कमी करतात, ज्या करतात ...

Harassment of women on social media too, 04 complaints to cyber | सोशल मीडियावरही महिलांचा छळ, सायबरकडे ०४ तक्रारी

सोशल मीडियावरही महिलांचा छळ, सायबरकडे ०४ तक्रारी

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक

- मुळात म्हणजे महिला या सोशल मीडियाचा वापर हा कमीत कमी करतात, ज्या करतात त्यातील किती महिलांचा कोणाच्या माध्यमातून छळ होत आहे, हे मात्र बाहेर येत नाही.

- महिला अथवा मुली या तक्रारी करण्यासाठी थेट पोलीस ठाण्याची पायरी चढताना दिसून येत नाही. तक्रारी करण्याऐवजी त्यांच्याकडून दुर्लक्ष अधिक केले जात असल्याचे समोर येत आहे.

येथे करा तक्रार

१) सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी त्रास देत असल्यास त्याच्यासंबंधी लागलीच आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्याशी संपर्क साधायला हवा.

२) महिला या सोशल मीडियाचा वापर खूप कमी प्रमाणात करतात. ज्या करतात त्यांची संख्या कमीच आहे. त्यांच्या माध्यमातून महिला सेलला तक्रार दिली जाऊ शकते.

३) सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अडचणी अथवा तक्रारी असल्यास पोलिसांचा सायबर सेल हा स्वतंत्रपणे कार्यरत करण्यात आलेला आहे. तिथे तक्रारी करू शकतात.

राजकीय महिलांचा कोट

कोणत्याही प्रकारे असो महिलांचा छळ होणे ही बाब समर्थनीय होऊ शकत नाही. महिलांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष कायम सुरू असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अकाउंट काढणाऱ्या प्रत्येकाची ओळख ही असायला हवी. जेणेकरून फेक अकाउंट कोणीही काढू शकणार नाही. छळ करणारा आरोपी तात्काळ सापडू शकेल.

-प्राची कुलकर्णी, मनसे

सायबर सेलप्रमुखाचा कोट

सोशल मीडियासंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधे आवश्यक आहे. तक्रारी देण्यासाठी सहसा कोणीही पुढे येत नाही. असे न करता आपण स्वत:हून आले पाहिजे. पोलीस आपल्या पाठीशी आहेत.

-सतीश गोराडे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल

महिला कार्यकर्तीचा कोट

सोशल मीडियाच्या माध्यमातून छळ केल्याच्या घटना कमी असल्यातरी त्या व्हायला नकोत. महिला या तक्रारी करण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. त्यांनी तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांनी तक्रारी केल्यास त्याची निश्चित दखल घेतली जाऊ शकते. त्यासाठी प्रबोधनाचीसुद्धा गरज आहे.

-महिला कार्यकर्ती,

सोशल मीडियाकडे आलेल्या तक्रारी

सन २०१८ - एकूण तक्रारी ०० महिलांनी केलेल्या तक्रारी ००

सन २०१९ - एकूण तक्रारी ०० महिलांनी केलेल्या तक्रारी ००

सन २०२० - एकूण तक्रारी १६ महिलांनी केलेल्या तक्रारी ०३

जुलै २०२१ - एकूण तक्रारी ०४ महिलांनी केलेल्या तक्रारी ०१

Web Title: Harassment of women on social media too, 04 complaints to cyber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.