बायकोकडून होतोय छळ, कोरोनाकाळात ३९ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:15+5:302021-07-23T04:22:15+5:30

मानसिक छळच नव्हे तर मारहाणही करते - काही ना काही कारणावरून मानसिक छळ सुरू असतो. त्यासाठी केवळ निमित्त हवे ...

Harassment by wife, 39 complaints during coronation | बायकोकडून होतोय छळ, कोरोनाकाळात ३९ तक्रारी

बायकोकडून होतोय छळ, कोरोनाकाळात ३९ तक्रारी

मानसिक छळच नव्हे तर मारहाणही करते

- काही ना काही कारणावरून मानसिक छळ सुरू असतो. त्यासाठी केवळ निमित्त हवे असते. ते सापडले की शिवीगाळ सुरू होते.

- कामावरून घरी येण्यासाठी थोडा वेळ झाल्यास पुन्हा तिची शिवीगाळ सुरू होते. बराच वेळ होऊनही ती थांबत नाही.

- माझ्या गोतकडील मंडळी आली की तिला आवडत नाही, ते गेल्यावर छळ तर हाेतोच शिवाय मारहाणदेखील होत असते.

कोरोनाकाळात तक्रारी वाढल्या

कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी बायकोविषयी तक्रारी होत्या; पण कोरोना सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम हा नोकरीवर होऊ लागल्याने छळाच्या घटनेत अधिक वाढ होत असल्याचे समोर आले.

आर्थिक टंचाई आणि अति सहवास

- कोरोना काळ सुरू झाल्यानंतर सर्वाधिक त्रास हा नोकरीवर झाला. हातातून नोकरी गेल्यामुळे घरसंसार कसा चालवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्रास देणे सुरू झाले.

- कोरोनामुळे हातातून नाेकरी गेली. दुसरी मिळत नसल्याने सर्वाधिक काळ हा पत्नीसोबत जात आहे. तर काही ठिकाणी घरीच थांबून काम सुरू असल्याचा परिणाम जाणवत आहे.

पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?

महिलांच्या हक्कासाठी अनेक संघटना काम करत आहेत. महिलांच्या बाजूने सर्व उभे असतात, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. असे असताना अनेक पुरुष हे आपल्या बायकोपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळले आहेत. अशा वेळी पुरुषांच्या बाजूने सुद्धा उभे राहण्याची आजच्या काळात गरजेचे झाले आहे.

- एक पत्नी पीडित.

Web Title: Harassment by wife, 39 complaints during coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.