तरूणीला जाळणाऱ्या नराधमाला फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:49 IST2020-02-05T12:48:59+5:302020-02-05T12:49:31+5:30
मागणी : महिला पदाधिकाऱ्यांचे निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील तरूण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळणाºया नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपा महिला पदाधिकाºयांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत़ त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे़ महिलांवर अत्याचार करणाºया नराधमांवर तत्काळ फाशीची शिक्षा देण्यासाठी सर्व प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे़ त्यामुळे दोषीवर कारवाई होऊन सामाजात कायद्याविषयी भिती निर्माण होईल़ निर्भया अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी़ तसेच पेट्रोेल टाकून जिवंत जाळणाºया प्राध्यापिकेला न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन देऊन या घटनेचा भारतीय जनता पार्टी, महिला व युवती आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला़यावेळी भाजपाच्या महिला प्रदेश अहिरराव, उपमहापौर कल्याणी अंपळकर, महिला बालकल्याण सभापती निशा पाटील, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रत्ना बडगुजर, युवती प्रमुख युवा मोर्चा अमृता पाटील, नगरसेविका प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी, मंजूषा लोहोलेकर, सुनिता सोनार, अनुया देशपांडे, पुजा कोकाटे, गायत्री भावसार, डॉ़ सुजाता आडे, सुरेखा उगले, तनुजा पिसाळ, कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.