हातपंप बंद असल्याने ग्रामस्थांची होते पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 21:43 IST2020-05-06T21:43:23+5:302020-05-06T21:43:37+5:30
दुरुस्तीची मागणी : पाणी असून वापर नाही

हातपंप बंद असल्याने ग्रामस्थांची होते पायपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथे जवळपास सात ते आठ हातपंप असून ते पूर्णपणे नादुरुस्त आहे. हातपंपांना बऱ्यापैकी पाणी असून सुद्धा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत आहे.
या हातपंपांना बºयापैकी पाणी उपलब्ध असले तरी हातपंपाचे साहित्य मात्र गायब झाले आहे. त्यामुळे हे हातपंप बंद आहेत. आगामी काळात पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून वसमार गावातील जवळपास सात ते आठ हातपंप बंद आहेत. वर्षभरापासून अनेकवेळा संबंधित विभागाला ग्रामस्थांनी हातपंप दुरुस्त करण्याबाबत सांगितले. परंतु वर्ष उलटले तरी हे हातपंप दुरुस्त करण्यात आले नाहीत. वसमार गावातील हातपंप दुरुस्त केल्यास ग्रामस्थांची पाण्याची होणारी पायपीट थांबू शकते. ८ ते १० दिवसात हे हातपंप दुरुस्त करून ग्रामस्थांची सध्या होणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी होत आहे.