दसेरा मैदान रस्त्यावरील पाच घरकुलांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:45+5:302021-02-05T08:45:45+5:30
दसेरा मैदान चाैकात भाजी विक्रेते, हाॅटेल व्यावसायिक, रसवंती तसेच लहान मोठे व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहे. तसेच याच भागात ...

दसेरा मैदान रस्त्यावरील पाच घरकुलांवर हातोडा
दसेरा मैदान चाैकात भाजी विक्रेते, हाॅटेल व्यावसायिक, रसवंती तसेच लहान मोठे व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहे. तसेच याच भागात क्लासेस, शाळा, हॉस्पिटल तसेच काॅलनी व व्यावसायिक क्षेत्र असल्याने आहे. शिवाय या भागात फेरीवाले व नागरिकांनी घरे व दुकाने थाटल्याने काही महिन्यांपासून वाहतुकीची कोंडीसह वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत रविवारी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने दसेरा मैदान ते रेल्वेस्टशन रोडवरील पाच घरांचे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने काढली. अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात आला होतो. मात्र विरोधाला न जुमानता अखेर येथील अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होतो. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एजाज शाह, महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव, सहाय्यक अभियंता ए.बी. पाटील आदी उपस्थित होते.
तातडीने सुरुवात...
संतोषी माता ते दसेरा मेैदानपर्यतचा रस्ता मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने माॅडेलरोड तयार करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. काेराेनामुळे बंद पडलेले काम पुन्हा जोमाने सुरू झाले आहे. त्यासाठी येथील अतिक्रमण प्रशासनाकडून काढण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा नागरिकांनी अतिक्रमण केल्याने रस्त्याचे कामाला अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमण रविवारी काढल्यानंतर रस्त्यावर खडी टाकून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.