गटार तुंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:17+5:302021-06-02T04:27:17+5:30

लसीकरण जनजागृती म्हसदी : साक्री तालुक्यातील विटाई येथे ग्रामपंचायत सदस्य मंगलबाई सोनवणे यांनी गावात घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी ...

The gutter is full | गटार तुंबली

गटार तुंबली

लसीकरण जनजागृती

म्हसदी : साक्री तालुक्यातील विटाई येथे ग्रामपंचायत सदस्य मंगलबाई सोनवणे यांनी गावात घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.

प्राचार्य चव्हाण निवृत्त

धुळे : तालुक्यातील शिरुड येथील एफ. एम. खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एल. बी. चव्हाण सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. कोरोना नियमांचे पालन केले.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बोराडी : शिरपूर तालुक्यातील तऱ्हाड कसबे येथील येथे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी सुधीर ईशी यांनी बियाण्यांची उगवण क्षमता याबाबत मार्गदर्शन केले.

पावसाळ्याची तयारी

धुळे : पावसाळा सुरू होण्याआधीच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे छतांची गळती बंद करण्यासाठी ताडपत्री आणि डिजिटल बॅनर खरेदीकडे महिलांचा कल वाढला आहे.

Web Title: The gutter is full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.