गुटखा साठाप्रकरणी अखेर व्यापाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:43 IST2020-05-17T20:43:40+5:302020-05-17T20:43:59+5:30

३० लाखांचा माल जप्त : दोन दिवसांनंतर सुपारी सेंटर मालकावर गुन्हा दाखल

Gutkha stockpile trader finally arrested | गुटखा साठाप्रकरणी अखेर व्यापाऱ्याला अटक

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील साक्री रोडवरील कुमारनगरात लाखो रुपयांचा गुटख्याचा बेकायदेशिर साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर सुपारी सेंटरचे व्यापारी प्रकाश ऊर्फ बाबु मोरुमल आसिजा (५२) यांना बेड्या ठोकल्या आहेत़
धुळे शहर पोलिसांच्या पथकाने १५ मे रोजी सायंकाळी छापा टाकून २९ लाख २४ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त केला होता़ परंतु गुन्हा दाखल करण्यास उशिर होत असल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते़ अखेर पालिसांनी रविवारी सकाळी गुन्हा दाखल केला़ जप्त केलेल्या गुटख्याचा मुद्देमाल मोजण्यात आणि इतर काही पुराव्यांची खातरजमा करण्यात वेळ गेल्याचे पोलिसांनी सांगितले़
कुमारनगरातील रहिवासी प्रकाश उर्फ बाबू मोरुमल आसिजा हे पानसुपारीचे घाऊक व्यापारी आहेत़ राजकमल सिनेमागृहाजवळ त्याच्या मालकीचे सुपारी सेंटर दुकान वजा गोडाऊन आहे़ असे असताना त्यांनी त्यांच्या घरात, भाडेतत्वाच्या घरात आणि जुन्या घरात विना परवाना गुटख्याचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी त्यांच्या तीनही घरांमध्ये तब्बल २९ लाख २४ हजार ८८० रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला़ त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखु, इतर तंबाखुयुक्त पदार्थ, सिगारेट यांचा समावेश आहे़
सध्या सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे़ कोरोनाची ही संसर्ग साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने लॉकडाउन केले आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी संचार बंदीचे आदेश दिले आहेत़ याची जाणीव असताना देखील संशयिताने आदेशाकडे दुर्लक्ष करुन बंदी असलेल्या गुटख्याचा आणि तंबाखुजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात विनापरवाना साठा करुन ठेवला़ तसेच बंदीमध्ये विक्री केल्यामुळे परिसरात गर्दी होवून सोशल डीस्टन्सिंगचे उल्लंघन झाले़ यातुन संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवून सामान्य जनतेच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे़
याप्रकरणी पोलिस नाईक अनिल किसन चौधरी यांच्या फिर्यादीवरुन धुळे शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ५९ सह भादंवि कलम २७२, २७३, २६९, १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लॉकडाउनमध्ये गुटख्याचा साठा करणे आणि विक्री करणे संबंधित व्यापाºयाला चांगलेच महागात पडले आहे़

Web Title: Gutkha stockpile trader finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे