शहरातील कुमारनगर भागातून लाखोंचा गुटखा व तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:54 IST2020-05-15T21:53:55+5:302020-05-15T21:54:29+5:30

पोलिसांची कारवाई : रात्री उशीरापर्यंत सुरु होती कारवाई

Gutkha and tobacco worth lakhs seized from Kumarnagar area of the city | शहरातील कुमारनगर भागातून लाखोंचा गुटखा व तंबाखू जप्त

शहरातील कुमारनगर भागातून लाखोंचा गुटखा व तंबाखू जप्त

धुळे : शहरातील कुमारनगर भागात एक व्यापाऱ्याच्या घरात गुटखा आणि तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करुन पोलिसांनी सायंकाळी घरातून लाखोंचा गुटखा आणि तंबाखू जप्त केला. रात्री उशीरापर्यंत माल मोजण्याची व अन्य कारवाई सुरु होती.
शहरातील कुमार नगरात सुंगधीत गुटख्याचा साठा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उगले आणि शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी कुमारनगर भागात राहणाºया बाबु भाई यांच्या घरावर छापा टाकला. ते घराच्या पुढच्या भागात त्यांचे दुकानही आहे. पोलिसांनी दुकानच्या मागील बाजुस असलेल्या घराची तपासणी केली असता. घरात सिगारेट, बिडी बंडल, सुंगधी गुटखा असा लाखोंचा माल आढळून आला. तो सर्व माल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती. त्यामुळे नेमका मुद्देमाल किती मिळाला हे स्पष्ट झाले नाही. परंतु तो लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: Gutkha and tobacco worth lakhs seized from Kumarnagar area of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे