कोरोना चाचणीसाठी गुरुजींची उडाली झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:41 IST2020-11-20T12:40:08+5:302020-11-20T12:41:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोनामुळे तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनामुळे तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व माध्यमाच्या शिक्षकांची कोरोना चाचणी करून घ्यावी अशा शासनाच्या सूचना आहे. त्या पार्श्वभूमिवर कोरोना चाचणी करण्यासाठी गुरुवारी जिल्हा रुग्णालयात शिक्षकांची झुंबड उडाली होती. जिल्हा रुग्णालयात गुरुवारी तब्बल १ हजार २२० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
शाळा सुरु होण्यापूर्वी कोरोना शिक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करावी अशा शासनाच्या सूचना आहे.त्या पार्श्वभूमिवर प्रत्येक तालुक्यात ९ नोव्हेंबरपासून शिक्षकांच्या कोरोना चाचणीला सुरूवात झालेली आहे. चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांची जिल्हा रूग्णालय तसेच तालुक्याच्या ठिकाणी गर्दी होत आहे. बुधवारी ७४८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. गुरुवारी त्यात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी तब्बल १ हजार २२० शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या गुरुवारी करण्यात आल्या. कोरोना चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांनी एकाच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. दरम्यान, गर्दी नियंत्रणात करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते.
प्रयोगशाळेवरील ताण वाढला - शिक्षकांची तपासणीमुळे प्रयोगशाळे वरील ताण वाढला. मात्र ह्यपूल टेस्टिंगह्ण करून २४ तासात अहवाल देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रयोगशाळा प्रमुख डॉ.माधुरी सूर्यवंशी यांनी सांगितले.