शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी गुरुजी, वाडा वस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:51+5:302021-03-14T04:31:51+5:30

मालपूर : कोरोना काळात अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले. येथील अनेक कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड करण्याकरिता बाहेरगावी गेली आहेत. ...

Guruji to find out-of-school children at Wada Vasti | शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी गुरुजी, वाडा वस्त्यांवर

शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी गुरुजी, वाडा वस्त्यांवर

मालपूर : कोरोना काळात अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले. येथील अनेक कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड करण्याकरिता बाहेरगावी गेली आहेत. या कुटुंबांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील बालक किंवा अल्पवयीन मुले शाळाबाह्य राहू नयेत, त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शिक्षक व दोंडाईचा शिक्षण विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे हे वाड्या-वस्त्यांवर फिरत आहेत. शाळाबाह्य मुलांची सध्या शोधमोहीम सुरू आहे. शुक्रवारी मालपूर गावातील शिक्षकांची सभा घेऊन शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाचा आढावा शिक्षण विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे यांनी घेतला. यावेळी त्यांनी स्वत: काही ठिकाणी शिक्षकांसमवेत सर्वेक्षणही केले. शाळाबाह्य विद्यार्थी अद्याप आढळलेले नाहीत. या शोध मोहिमेंतर्गत १० मार्चपर्यंत सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षण कामासाठी शिक्षकांना आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी मदत केली.

चौकट - एकूण कुटुंब संख्या १,८५०

सर्वेक्षण झालेली कुटुंब १,०४८.

विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थी ७ अधिक ५

सर्वेक्षण परिसर - गाव परिसर, वाडी, वस्ती, वीट भट्टी.

सहभागी शाळा व शिक्षक

जिल्हा परिषद केंद्र शाळा, मालपूर क्र. १- ७ शिक्षक, जिल्हा परिषद कन्या शाळा मालपूर क्र. २ - ४ शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, मालपूर क्र. ३ - २ शिक्षक, स्वो. वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल, मालपूर शिक्षक २, माध्यमिक विद्यालय, मालपूर शिक्षक ६, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, मालपूर शिक्षक २ आदी शाळेतील शिक्षक या सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत.

Web Title: Guruji to find out-of-school children at Wada Vasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.