दत्तवायपूरमध्ये गुरूदत्त परिवर्तन पॅनेलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:33+5:302021-01-22T04:32:33+5:30

दत्तवायपूर - शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री गुरुदत्त परिवर्तन पॅनेलने सात जागांवर विजय मिळवला तर विरोधी महाविकास ...

Gurudatta Parivartan Panel bet in Dattavaipur | दत्तवायपूरमध्ये गुरूदत्त परिवर्तन पॅनेलची बाजी

दत्तवायपूरमध्ये गुरूदत्त परिवर्तन पॅनेलची बाजी

दत्तवायपूर - शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री गुरुदत्त परिवर्तन पॅनेलने सात जागांवर विजय मिळवला तर विरोधी महाविकास आघाडी पॅनेलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. दत्तवायपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपतर्फे आमदार जयकुमार भाऊ रावल यांचे समर्थक दत्तात्रय बाबुलाल पाटील यांच्या श्री गुरुदत्त परिवर्तन पॅनेलने ९ पैकी १ जागा बिनविरोध तर ६ सदस्य निवडून आणत विजय मिळवला. विरोधी पॅनेलला दोन जागांवर विजय मिळाला.

श्री गुरुदत्त परिवर्तन पॅनेलचे दत्तात्रय बाबुलाल पाटील, किरणबाई साहेबराव पाटील, प्रतिभा पाटील, गंगाराम हरचंद बागुल, लक्ष्मी सुनील बागुल, रेखाबाई सूर्यवंशी, मीराबाई किसन पाटील (बिनविरोध) असे सात सदस्य विजयी झाले. तर महाविकास आघाडी पॅनेलचे भारती योगेश पाटील, माधुरी नरेंद्र पाटील हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. आर. जी. खैरनार, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष लखन रुपनर, निसर्ग मित्र समितीचे संतोष पाटील आदींनी स्वागत केले.

Web Title: Gurudatta Parivartan Panel bet in Dattavaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.