माऊली मल्टिस्टेट प्रकरणातील भैय्या गुजेलाचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:41 IST2021-02-16T22:41:17+5:302021-02-16T22:41:37+5:30
आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक प्रकरण

माऊली मल्टिस्टेट प्रकरणातील भैय्या गुजेलाचा जामीन फेटाळला
धुळे : आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक प्रकरणातील संशयित भैय्यासाहेब यशवंत गुजेला याने न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला, अशी माहिती तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी दिली़ माऊली मल्टिस्टेट सोसायटी स्थापन करुन त्यात गुंतवणूक केल्यास ठेवीदारांना आकर्षक व्याजदर, वेगवेगळे बक्षिस, प्रेक्षणीय ठिकाणी सहल असे आमिष दाखवून १ हजार ४६१ ठेवीदारांची १० कोटी २९ लाख ४१ हजार ९५६ रुपयांची फसवणूक प्रकरणातील संशयित असलेला भैय्यासाहेब यशवंत गुजेला (रा़ धुळे) याला मुंबईतील पवई येथून पकडण्यात आले होते़ सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे़ त्याने दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज सादर केला होता़ त्याच्या जामीन अर्जावर धुळे न्यायालयात कामकाज झाले़ सहायक सरकारी वकील गणेश पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली़ त्यांना तपासी अधिकारी हेमंत बेंडाळे यांनी आवश्यक ती कागदपत्रे पुरवून मदत केली़