निजामपूरला मेळाव्यात कायद्यावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:24 IST2020-03-15T12:23:36+5:302020-03-15T12:24:02+5:30
ज्येष्ठ महिला मेळावा । मोठ्या संख्येत ज्येष्ठ महिलांची उपस्थिती

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : निजामपूर येथे श्री मनुदेवी जेष्ठ महिला संघ निजामपूर तर्फे आयोजित जागतिक महिला सप्ताह निमित्त ज्येष्ठ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
वाणी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात स्वागतगीत हर्षदा राजेंद्र राणे व मोनाली बदामे यांनी प्रस्तुत केले. अध्यक्षस्थानी पुष्पा बदामे होत्या. मेळाव्याला प्रमुख वक्त्या साक्री येथील नगरसेविका अॅड.पुनम काकूस्ते होत्या. ‘महिला सुरक्षा व ज्येष्ठ नागरिक कायदा २००७’ याविषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून साक्रीच्या नगरसेविका वर्षा येवले होत्या.
पिंपळनेर येथील वाणी समाज महिला मंडळाच्या माजी सदस्या व शिक्षिका मंजुषा नंदकुमार राणे यांनी महिला वर्गाने सक्षम होण्याच्या गरजेवर मनोगतातून विस्तृत विचार मांडले. दिव्या दिलीप कोठावदे यांनी शाळकरी मुलगा व आई यांच्या वरील कविता सादर केली. महिला संघाच्या सदस्या चित्रा राणे यांनी एक गीत सादर केले. शरदचंद्र शाह यांनी आपल्या मनोगतातून शाळकरी मुलींना मोबाईल देऊ नका, असे विनम्र आवाहन केले.
श्री मनुदेवी ज्येष्ठ महिला संघाच्या अध्यक्षा मंगला शिरोडे यांच्यासह पदाधिकारी व निजामपूर, जैताणे, पिंपळनेरसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ महिलावर्गाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हर्षा शिरोडे यांनी केले. आभार चित्रा राणे यांनी मानले.