निरंकारी भक्तांचा जत्था पानिपतकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:56 IST2019-11-11T21:55:44+5:302019-11-11T21:56:04+5:30
पिंपळनेर : ७२ वा आंतरराष्ट्रीय निरंकारी संत समागम साजरा होणार

निरंकारी भक्तांचा जत्था पानिपतकडे रवाना
पिंपळनेर : समालखा (पानीपत, हरियाणा) येथे ७२ व्या निरंकारी संत समागमासाठी निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर शाखामधील ४५ भक्तांचा एक जत्था सोमवारी पिंपळनेरहून इंदूरकडे विशेष बसने रवाना झाला.
त्यावेळी शाखेचे प्रमुख जगदीश ओझरकर, परिसरातील भक्तगण व कर्मचारी उपस्थित होते़ पिंपळनेरमधून इंदूर, सूरत, मनमाड, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव मार्गाने शेकडो भक्त तर धुळे झोनमधून हजारो भक्तांची मांदीयाळी असणाºया या भव्य संत समागमात सहभागी होणार आहेत.
समालखा या निरंकारी मंडळाच्या आध्यात्मिक स्थळी दि. १६, १७ आणि १८ नोव्हेंबर दरम्यान निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पवित्र सान्निध्यात ७२ वा आंतरराष्ट्रीय निरंकारी संत समागम साजरा होणार असून त्यासाठी भक्त रवाना झाले आहेत.