जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:15 IST2020-01-03T23:14:11+5:302020-01-03T23:15:42+5:30

कार्यक्रमांसह स्पर्धा व रॅलींचे आयोजन

 Greetings to Savitribai Phule on birth anniversary | जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Dhule

धुळे : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, पक्ष संघटना, शालेय संस्थांमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करुन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धा व रॅलींचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय
धुळे - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन (प्रशासन) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Greetings to Savitribai Phule on birth anniversary

टॅग्स :Dhuleधुळे