मराठा सेवा संघांच्या महिला पदाधिकाऱ्यांतर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:55 IST2020-02-24T11:55:30+5:302020-02-24T11:55:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे रविवारी धुळ्यातील प्रोफेसर कॉलनीत संत ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे रविवारी धुळ्यातील प्रोफेसर कॉलनीत संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी झाली़ अध्यक्षस्थानी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रा़ वैशाली पाटील होत्या़
यावेळी परिषदेच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराजांना अभिवादन केले़ परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी अर्चना पाटील तर दिपाली पाटील यांची जिल्हा सचिवपदी निवड झाली़
जगात माणूस ही एकमेव जात आहे असे सांगून प्रबोधन करणारे गाडगेबाबा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते़ दिवसभर स्वच्छता करुन रात्री आपल्या किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रध्देची जळमटे उखडून काढण्याचे महान कार्य करणाºया गाडगेबाबां सारखे राष्ट्रसंत आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत़, अशा शब्दात प्रा़ वैशाली पाटील यांनी संत गाडगे महाराजांच्या कार्याचा अवाका सांगितला़ यावेळी सुरेखा बडगुजर यांच्यासह परिषदेच्या सर्व भगिनी, प्रोफेसर कॉलनी, मयूर कॉलनी, जयहिंद कॉलनी, सुयोग नगर, आधार नगरसह कॉलनी परिसरातील महिला उपस्थित होत्या.