धुळे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:18 IST2019-11-18T11:18:14+5:302019-11-18T11:18:34+5:30
ठिकठिकाणी प्रतिमा पूजन, घोषणांनी परिसर दणाणला

धुळे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतिदिन रविवारी साजरा झाला. यानिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर ठिकठिकाणी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
ॅशिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली होती. सकाळी ६ वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.पंकज गोरे, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, सुदर्शन पाटील, जनार्दन मासुळे, मच्छिंद्र निकम, भटू गवळी, जवाहर पाटील, डिगंबर चौधरी, संजय पाटील, दीपक माळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादनानंतर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले.
भगवा चौक
येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसाणे (ता. साक्री)
येथेही कार्यक्रम
दुसाने व बळसाणे गावात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या विविध घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास दुसाने गावाचे सरपंच कैलास पवार, बळसाण्याचे लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरास यांच्यासह माजी सरपंच शामराव भदाणे, बळसाणचे उपसरपंच सुदाम खांडेकर, आबासाहेब भदाणे, डॉ. प्रशांत महाले, सदा महाले, भाऊ सोनवण, बाळा सोमवंशी, पंकज भदाणे, नंदू सूर्यवंशी, हट्टी सुखदेव मासुळे, बापू माळचे, धनसिंग वसावे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन चिंतामण मासुळे, हिंमत गिरासे, विवेक पिंपळे, कमलेश वाघ, शाखाप्रमुख आनिल.ठाकरे, धर्मा भदारे, रविंद्र महाले, युवराज खांडेकर, नाना धनुरे, हरीश सनेर, सागर टेलर, विनोद महाले, वसीम पठाण, योगेश महाजन, मोहन दहिते, दीपक पवार, समाधान भिल, भूषण कोळी, आबा धनगर, भैया मिस्तरी, प्रकाश सोनवणे, सुरेश सोनवणे, भैया पाकळे यांच्यासह गावातील शिवसैनिकांनी केले होते.