निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:26+5:302021-01-20T04:35:26+5:30
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील निराधार, निराश्रित, परित्यक्ता व विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अनुदान राज्य शासनाच्या ...

निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी मिळणार अनुदान
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील निराधार, निराश्रित, परित्यक्ता व विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अनुदान राज्य शासनाच्या विशेष पॅकेज मधून योजना राबविण्यासाठी राज्य शासनामार्फत शासननिर्णय पारित केला आहे. या शासननिर्णयानुसार निराधार, निराश्रित, परितक्त्या व विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान ही योजना केवळ खुला व इतर मागास प्रवर्गातील रुपये एक लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांकरिता या कार्यालयामार्फत राबविण्यात येते.
ही योजना राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, धुळे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून संबंधित लाभार्थ्यास १० हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील निराधार, निराश्रित, परित्यक्ता व विधवा महिलांनी त्यांच्या मुलींचा विवाह झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय (प्लॉट क्रमांक ५२ , जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे) येथे सादर करावेत.