मयत शिक्षकांच्या परिवाराला अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:43+5:302021-07-17T04:27:43+5:30
कोविड काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त मयत शिक्षक हे धुळे जिल्ह्यात झाले असल्यामुळे त्यातील लाभार्थी शिक्षकाच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाने ...

मयत शिक्षकांच्या परिवाराला अनुदान द्या
कोविड काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त मयत शिक्षक हे धुळे जिल्ह्यात झाले असल्यामुळे त्यातील लाभार्थी शिक्षकाच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाने जाहीर केलेले पन्नास लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात यावे,तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामामुळे धुळे जिल्हा महाराष्ट्रात तिसरा व विभागात पहिला क्रमांक मिळवला आहे.त्यामुळे मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांचे यांचे सन २०२०-२१चे मानधन त्वरित देण्यात यावेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत दिव्यांग,तसेच महिला व केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात येऊ नये, असा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, जिल्हा प्रमुख संघटक ऋषीकेश कापडे,कार्याध्यक्ष प्रशांत महाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.