डोक्यात कोयता घालत नातूकडून आजोबाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 16:46 IST2021-03-19T16:45:56+5:302021-03-19T16:46:17+5:30

धुळे तालुक्यातील वार येथील घटना, फरार नातूचा पोलिसांकडून शोध सुरु

Grandfather murdered by grandson with a scythe | डोक्यात कोयता घालत नातूकडून आजोबाचा खून

डोक्यात कोयता घालत नातूकडून आजोबाचा खून

धुळे : जून्या वादातून चुलत नातुने आजोबांच्या डोक्यात कोयता घालून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. घटनेनंतर नातू फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मात्र वार ग्रामस्थ सुन्न झाले होते. दरम्यान, फरार झालेल्या नातूचा पोलीस शोध घेत आहेत.
धुळे तालुक्यातील वार येथे आत्माराम हिरामण पारधी (६८) हे पत्नी आणि चार मुले व चार सुना यांच्यासह राहतात. गावात त्यांच्या घराजवळ त्यांचा चुलत नातू ज्ञानेश्वर पवार - पारधी राहतो. आत्माराम पारधी यांच्या शेजारीच ज्ञानेश्वरच्या आजीचे घर आहे. त्यामुळे त्याचे तेथे नेहमी येणे-जाणे असायचे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे आजीकडे आला. त्यावेळी ज्ञानेश्वरीने कौटुंबिक वादाची कुरापत काढून शेजारीच असलेल्या आत्माराम पारधी यांच्याशी वाद घातला. यावेळी संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरने आपल्या हातातील कोयत्याने थेट आत्माराम पारधी यांच्या डोक्यावर वार केले. यामुळे आत्माराम हे गंभीर दुखापती होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले.
रक्तश्राव अधिक झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचेही पथक दाखल झाले. घटनास्थळी सरपंच दिलीप गिरासे, उपसरपंच निंबा अहिरे, पोलीस पाटील किशोर वाघ उपस्थित होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून संशयित ज्ञानेश्वर पवार - पारधी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो फरार झाला असल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत.

Web Title: Grandfather murdered by grandson with a scythe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे