शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:13 PM

भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातुन काढण्यात आलेली शोभायात्रेत सहभागी समाजबांधव़ 

धुळे : जन्मकल्याणक महोत्सव, नवकार मंडल संघटनासह सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली़  यावेळी मतदान जनजागृती शिबिरातून प्रबोधन करण्यात आले होते़ शहरातील ग़नं़ २ मधील शितलनाथ जैन मंदिर येथून सकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा सकल जैन समाज सहभागी झाला होता़ या शोभायात्रेत चांदीच्या  रथात भगवान महावीरांच्या मुर्ती विराजमान होती़ जैन धर्मातील सर्व पुरूष, महिला, तरूण, तरूणी उत्साह दिसुन आला़ शहरातील मुख्य बाजार पेठेसह प्रमुख मार्गात जैन सोशल गृपतर्फे  शीतपेयची ठिक-ठिकाणी व्यवस्था करण्यात आले.  निवडणूक आयोग व जैन सोशल गृपतर्फे यंदा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदाता जनजागृती अभियान राबविण्यात आले़ यावेळी  नवीन तंत्रज्ञानाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने मतदान करण्यासाठीचे मॉडेलच्या सहाय्याने उपस्थित नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले़ यावेळी घोषणा व फलकासह सेल्फी पोइंटची व्यवस्था करण्यात आली होती़  या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी भेट देऊन उपस्थित जैन समुदायाला निर्भीडपणे व बहुसंख्येने मतदान करण्याचे आवाहन केले़ शिंदखेडयात रक्तदान भारतीय जैन संघटना शाखेतर्फे भगवान महावीर जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील बसस्थानकासमोर शिबीर घेण्यात आले़. सकाळी ९ ते २ या वेळेत रक्तदान झाले. या शिबिरात एन. डी. मराठे शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रथम रक्तदान करुन शिबिराचे उघाटन केले़ येथील अर्पण रक्तपेढीचे डॉ़ भारत पवार, प्रशांत राजपूत, निवृती भदाने हर्षदा पिंगले, प्रियंका सावळे, शिवानी जयस्वाल यांनी सहकार्य केले. बिजासणी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात इंदुर येथील राकेश जैन यांनी मार्गदर्शन केले़ सुमित जैन स्वाध्वी पियूषाजी,पदमिनीजी यांचे व्याख्यान झाले़ यावेळी गायन, स्पर्धा घेण्यात आली़ कार्यक्रमात भारतीय जैन संगटनेचे विभागीय कार्यध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा, शहर अध्यक्ष भगचंद कर्नावट, सचिव हितेंद्र जैन, उपाध्यक्ष विजय बोथरा, मयूर ओस्तवाल, सुमित जैन, अक्षय बाफना, अशोक राखेचा, रविंद्र कवाड आदी उपस्थित होते़ पिंपळनेर येथे सामुहिक शपथ येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजाविण्याची शपथ घेण्यात आली.  येथील राजस्थान पंच मंडळ, श्री जैन संघ व नवयुवक मंडळातर्फे बुधवारी महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली़ बाजार पेठ येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सकल जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता़  भगवान महावीर यांची प्रतिमा रथावर ठेऊन भव्य शोभायात्रा बाजार, खोल गल्ली बसस्थानक,  सटाणा रोड मार्गे महावीर भवनपर्यत काढण्यात आली़  कार्यक्रमात भगवान महावीर यांचे विचार व कार्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले़

टॅग्स :Dhuleधुळे