कापडणे येथे ग्रा.पं. कर्मचारी धरणात बुडाला
By Admin | Updated: June 1, 2017 13:36 IST2017-06-01T13:36:10+5:302017-06-01T13:36:10+5:30
धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रा.पं. कर्मचारी सोनवद धरणात विजेचा पंप बसवून बाहेर येत असताना घसरून धरणात पडल्याने तो बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कापडणे येथे ग्रा.पं. कर्मचारी धरणात बुडाला
ऑनलाईन लोकमत
कापडणे ,दि. 1- धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रा.पं. कर्मचारी सोनवद धरणात विजेचा पंप बसवून बाहेर येत असताना घसरून धरणात पडल्याने तो बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. धर्मराज उत्तम बडगुजर (25) असे या कर्मचा:याचे नाव आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
येथील ग्रामपंचायतीचे सहा ते सात कर्मचारी गावाच्या पाणीपुरवठय़ासाठी सोनवद धरणाजवळ असलेल्या उदभव विहिरीवर गेले होते. पाणीपुरवठय़ासाठी विजेचा पंप (जलपरी) सोनवद धरणात खाली उतरून पाण्यात सोडण्यात आला. त्या नंतर सर्व एकापाठोपाठ चढून वर आले. परंतु धर्मराज दिसत नसल्याने तो घसरून धरणात बुडाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत आहे.