राज्यपाल दाखल होत असल्याने महापालिकेत यंत्रणा दक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:38 IST2021-02-04T11:38:02+5:302021-02-04T11:38:27+5:30
नागरीकांसह पदाधिकारी, अधिकारी येण्यास सुरुवात

राज्यपाल दाखल होत असल्याने महापालिकेत यंत्रणा दक्ष
धुळे : बारीपाडा येथील कार्यक्रम आटोपल्यामुळे धुळ्याच्या दिशेने निघालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच येणार असल्यामुळे महापालिकेतील यंत्रणा सज्ज झाली आहे़ नागरीकांसह पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित आहेत़
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील कार्यक्रम आटोपून धुळ्याकडे रवाना झाले आहेत़ त्या पार्श्वभूमीवर येथील महापालिकेजवळ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़ ज्यांच्याकडे पास दिले आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात येत आहे़ शिवाय या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे़