राज्यपाल ४ फेब्रुवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:16+5:302021-02-05T08:46:16+5:30
राज्यपाल यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त अजिज ...

राज्यपाल ४ फेब्रुवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर
राज्यपाल यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक एम. एम. भोसले, हिरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रकाश पवनीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, राज्यपाल बारीपाडा येथील विविध वनसंवर्धन, जलसंवर्धन, वनकायद्याची अंमलबजावणीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधतील. तसेच धुळे येथे श्री समर्थ वाग्देवता मंदिर येथे रामायणाच्या किष्किंधा कांडचे प्रकाशन करतील. या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे संबंधित प्रत्येक विभागाने सूक्ष्म आणि परिपूर्ण नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक ओळखपत्र पोलिस विभागाकडून वेळेत प्राप्त करून घ्यावेत. पोलिस दलाने कायदा आणि सुव्यवस्थेसह सुरक्षेचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अचूक अक्षांश- रेखांशासह हेलिपॅड तयार करावीत. आरोग्य विभागाने पथके तैनात करावीत, तर वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत राहील, अशी दक्षता घ्यावी. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रत्येक विभागाची जबाबदारी आणि राज्यपाल यांच्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी तहसीलदार गायत्री सैंदाणे, अपर तहसीलदार प्रवीण थवील, संजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.