सरकारच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:08 IST2020-02-12T23:08:00+5:302020-02-12T23:08:30+5:30
पाच दिवसांचा आठवडा : कर्मचाऱ्यांनी केला आनंद साजरा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : केंद्राप्रमाणे राज्यात देखील पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाला़ या निर्णयाचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे़
केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाºयांसाठी देखील पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती़ बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच दिवसांच्या आठवड्या मंजुरी मिळाली आहे़ या निर्णयाचे धुळ्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाºयांनी स्वागत केले असून घोषणाबाजी करुन आनंद व्यक्त करण्यात आला़ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने वर्ग ३ व ४ तसेच शिक्षकांच्या इतर महत्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे़ अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी ही आग्रही मागणी आहे़ सरकारने चर्चेची वेळ देवून कर्मचारी, शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केली आहे़