शेतकऱ्यांसाठी खुशखबर; रोहयोमध्ये शेततळे अस्तरीकरणासाठीही पैसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:28+5:302021-04-15T04:34:28+5:30
रोजगार हमी योजना विभागाच्या या निर्णयामुळे अस्तरीकरणाच्या कामांबाबत होत असलेल्या खर्चाच्या बाबी कशा व कोणत्या पद्धतीने बसवायच्या, या विषयीचा ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; रोहयोमध्ये शेततळे अस्तरीकरणासाठीही पैसा
रोजगार हमी योजना विभागाच्या या निर्णयामुळे अस्तरीकरणाच्या कामांबाबत होत असलेल्या खर्चाच्या बाबी कशा व कोणत्या पद्धतीने बसवायच्या, या विषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. राेहयोमध्ये शेतकरी आधी स्वखर्चातून अस्तरीकरणाचा समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होईल. प्लास्टिक पेपर टाकल्यामुळे पाणीसाठा जास्त काळ उपलब्ध होतो. उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी अस्तरीकरण महत्त्वाचे असते.
शेततळे अस्तरीकरणाचे मापदंड असे
आकार अकुशल कुशल
३०x३०x३ २९५८२ १२६५४५
३०x२५x३ २५६६५ १०९७९१
२५x२५x३ २२२४४ ९५१५५
२५x२०x३ १८८२३ ८०५१९
२०x२०x३ १५६२० ६६८१७
२०x१५x३ ११९७४ ५१२२२
१५x१५x३ १०७१५ ४५८३६
१०x१०x३ ६७७४ २८९८०