केवळ ५० जणांच्या उपस्थितीत शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:27 IST2020-06-23T22:24:22+5:302020-06-23T22:27:16+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : अधिक उपस्थिती असल्यास कारवाई

Good luck in the presence of only 50 people | केवळ ५० जणांच्या उपस्थितीत शुभमंगल

केवळ ५० जणांच्या उपस्थितीत शुभमंगल

धुळे : धुळे जिल्ह्यातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० नागरिकांच्या मर्यादेत आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग तसेच कोविड १९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभाच्या परवानगी देण्यासाठी तहसीलदार, अपर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. परवानगी न घेतल्यास कारवाईबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सोमवारी पारीत केले़
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, राज्यात कोरोना विषाणूमुळे उदभवणाºया संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्त्व प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्त्व आपत्कालिन उपाययोजना म्हणून साथरोग अधिनियमाची राज्यात १३ मार्च २०२० पासून अंमलबजावणी सुरू आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
त्यानुसार धुळे जिल्ह्यातील तहसीलदार, अपर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत फिजिकल डिस्टन्सिंग तसेच कोविड 19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास अशी परवानगी देण्यासाठी संबंधित तहसीलदार, अपर तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी प्राधिकृत करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Good luck in the presence of only 50 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे