सुवर्णपेढीला 'आयकर'चा टच!
By Admin | Updated: December 4, 2014 14:56 IST2014-12-04T14:56:59+5:302014-12-04T14:56:59+5:30
सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती.

सुवर्णपेढीला 'आयकर'चा टच!
जळगाव/भुसावळ : सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती. तर भुसावळच्यादोन प्रतिष्ठानांवर याच पथकातील अधिकार्यांनी दिवसभर तपासणी केली.
जळगावातील सराफ बाजारातील सुराणा ज्वेलर्सचे संचालक किशोर सुराणा यांच्याकडे पथकाने खतावणी, नोंदवही तसेच स्टॉक रजिस्टरची मागणी केली. सुराणा यांनी पुरविलेली माहिती व प्रत्यक्षात दुकानात असलेले सोने व चांदीचे दागिने यांची पडताळणी पथकाकडून करण्यात येत होती.
चौफेर तपासणी : विभागाच्या आणखी काही पथकांकडून काही प्रतिष्ठांनाची तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा प्राप्त होऊ शकला नाही. तपासणीत नेमकी काय माहिती हाती लागली? याचा तपशील देण्यास अधिकार्यांनी नकार दिला. तर स्थानिक पथकाकडून ही तपासणी सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रतिष्ठानांकडून विक्री झालेल्या मालाबाबत कागदपत्रांची तपासणी केली. माहिती देण्यास अधिकार्यांनी असर्मथता दर्शवली. केवळनियमित तपासणी असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------
भुसावळातील जामनेर रस्त्यावरील मनोहर मनवानी यांच्या सेरॉमिक सेंटरसह दिनेश मोटूमल चांदवाणी यांच्या आकार ट्रेडर्समध्ये आयकर विभागाने सकाळपासून तपासणी केली. नियमित स्वरूपाची ही तपासणी आहे. यापूर्वी पाच ते सहा वर्षांपूर्वीदेखील तपासणी करण्यात आली होती. -किशोर सुराणा, सुराणा ज्वेलर्स
सुराणा यांच्याकडे तपासणीदरम्यान पथकाने दुकानातील कारागीर तसेच मालकांना बाहेर न जाण्याची सूचना केली. आयकर अधिकार्यांकडून तपासणी सुरू असल्याने दिवसभर व्यवहार बंद होते.