महिल्याच्या गळ्यातून सोनपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:54+5:302021-01-23T04:36:54+5:30
धुळे शहरातील जमनागिरी रोडवरील भावसार कॉलनीत राहणारी रंजना विजय सूर्यवंशी (६०) या वृद्ध महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ...

महिल्याच्या गळ्यातून सोनपोत लांबविली
धुळे शहरातील जमनागिरी रोडवरील भावसार कॉलनीत राहणारी रंजना विजय सूर्यवंशी (६०) या वृद्ध महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रंजना सूर्यवंशी ही महिला धुळ्यातील बस स्थानकातील अमळनेरकडे जाणाऱ्या स्टॉपजवळ उभी होती. २० जानेवारी रोजी भरदुपारी अडीच वाजेच्या सुमारास धुळे ते चोपडा बसमध्ये चढत असताना चोरट्याने संधी साधली. गर्दीमध्ये त्या महिलेच्या जवळ येऊन कोणीतरी चोरट्याने संधी साधत, शिताफीने महिलेच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाची ४८ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत लंपास केली. गर्दी असल्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. बसमध्ये चढल्यानंतर आपल्या गळ्यात सोन्याची मंगलपोत नसल्याची बाब उजेडात आल्यानंतर महिलेने आरडाओरड केली. शोधा-शोध करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जाऊन रंजना विजय सूर्यवंशी या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, २१ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी दुसाने घटनेचा तपास करीत आहेत.