देवपुरात दोन गटात वाद, दगडफेक, तीन ताब्यात
By Admin | Updated: January 22, 2017 00:05 IST2017-01-22T00:05:19+5:302017-01-22T00:05:19+5:30
कपडे धुणा:या महिलेला शनिवारी दुपारी एका दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला होता़ तो मिटल्यानंतर त्यावरूनच रात्री साडेआठ वाजता दोन गटात वाद झाला़ शिवीगाळ, दमदाटीही करण्यात आली़

देवपुरात दोन गटात वाद, दगडफेक, तीन ताब्यात
धुळे : देवपुरातील सुशीनाला काठावर असलेल्या भिलाटी भागात घराजवळ कपडे धुणा:या महिलेला शनिवारी दुपारी एका दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला होता़ तो मिटल्यानंतर त्यावरूनच रात्री साडेआठ वाजता दोन गटात वाद झाला़ शिवीगाळ, दमदाटीही करण्यात आली़ तसेच एकमेकांच्या अंगावर दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला़
त्यामुळे परिसरात पळापळही झाली़ घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ पथकासह घटनास्थळी दाखल झाल़े तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक हिंमत जाधव, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रदीप पाडवी व कमांडो पथकदेखील तातडीने दाखल झाले. त्यांच्याकडून जमावाला पांगविण्यात आले. पोलिसांनी दोन तीन जणांना ताब्यात घेतल़े याबाबत रात्री उशिरार्पयत देवपूर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता़ दरम्यान घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े घटनेची शहरात चर्चा सुरू होती़