नेर येथील पदाधिकाऱ्यांचे देव पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST2021-01-18T04:32:46+5:302021-01-18T04:32:46+5:30
नेर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य तथा महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गायत्री ...

नेर येथील पदाधिकाऱ्यांचे देव पाण्यात
नेर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य तथा महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गायत्री संजय जयस्वाल, माजी ग्रामपंचायत सदस्य देवीदास धनराज माळी, माजी पंचायत समितीच्या सदस्या जबनाबाई देवा सोनवणे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य मांगू चैत्राम मोरे तर वॉर्ड क्रमांक ४मध्ये पंचायत समितीच्या सदस्या सोनू सुमित जयस्वाल यांचे पती सुमित संजय जयस्वाल हे निवडणूक रिंगणात आहेत, तर जिल्हा परिषदेच्या सदस्य मनीषा खलाणे यांचे पती शंकरराव खलाने परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. यंदा निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने प्रत्येकजण विजयी होण्याचे दावे करीत आहेत. त्यामुळे आजी-माजी सदस्य, पदाधिकाऱ्यांचीही धाकधुक वाढली आहे. सोमवारी मतमोजणी होणार असल्याने अनेकांनी देव पाण्यात टाकले आहेत. तर काही जण निकालानंतर गुलाल उधळण्याच्या तयारीत आहेत. यामुळे ग्रामस्थांनाही निकालाची प्रचंड उत्सुकता लागून आहे.
ढोल-ताशे गुलालाची खरेदी.....
अनेकांना विजयी होण्याची शंभर टक्के खात्री असल्याने त्यांनी ढोल-ताशे आधीच बुक करून ठेवले आहेत तसेच गुलालही विकत घेऊन ठेवला आहे. याबरोबरच मोठ्या प्रमाणावर फटाके खरेदी केले आहेत. काही झाले तरी विजयाचा जल्लोष हा जोरदार करायचा, असे नियोजन करण्यात आले आहे.