दोंडाईचा येथे शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST2021-09-06T04:39:52+5:302021-09-06T04:39:52+5:30
शिंदखेडा पंचायत समितीचा शिक्षण विभाग वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी व शाळा प्रगत करण्यासाठी दोंडाईचा बिटमार्फत विस्ताराधिकारी ...

दोंडाईचा येथे शिक्षकांचा गौरव
शिंदखेडा पंचायत समितीचा शिक्षण विभाग वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी व शाळा प्रगत करण्यासाठी दोंडाईचा बिटमार्फत विस्ताराधिकारी सी. डी. सोनवणे यांचा प्रयत्नाने शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. यात जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी प्राथमिक शाळा, आश्रम शाळा, माध्यमिक शाळा यातील गुणी शिक्षकांचा प्रमाणपत्र, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम रोटरी इंग्लिश स्कूलला आयोजित करण्यात आला होता. आजचा कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा व नगरपालिका शाळेतील प्रत्येकी दोन आदर्श शिक्षक, दोन आदर्श शाळा, सह १४६ मुख्याध्यापक व उपशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात
अंबादास निकम, सुनील मोरे यांना आदर्श शिक्षक व आदर्श शाळा म्हणून जि. प. शाळा देगाव घोषित, दोंडाईच्यातील डॉ. अब्दुल कलाम उर्दू स्कूल या शाळांना आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आले. या सहप्राचार्य डी. एन. जाधव, प्राचार्य आर. डी. वसईकर, प्राचार्य एन. डी. गिरासे, मुख्याध्यापक
ए. डी. पाटील, प्राचार्य एम. पी. पवार, मुख्याध्यापक सदाशिव भलकार, उपशिक्षक अशपाक शेख, ए. एन. पाटील, आर. डी. चौधरी, एन. पी. भिलाने, हितेंद्र राजपूत अरुण पाटील, विश्वास पाटील, अनिस पठाण, सुरेखा राजपूत, अंशुल कपूर, किशोर घरटे, साधना पाटील, शशिकांत तावडे, संजय कुंभार आदींचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, रोटरी स्कूल अध्यक्ष हिमांशू शाह, प्रिन्सिपल एम. पी. पवार, डायटचे शिवाजी ठाकूर आदी होते.
अध्यक्षस्थानावरून गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील म्हणाले की, शिक्षकदिन आपल्या शिक्षकांचे गुणगौरव करण्यासाठी आहे. शिक्षणासह कोरोनाकाळात शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोरोनामुळे शिक्षणाचे सर्वांत मोठे नुकसान झाले. कोरोनात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, रेशन दुकानांवर रेशन देणे, गावाचा वेशीवर थांबून परजिल्ह्यातील नागरिकास तपासणी करणे आदी कामे शिक्षकांनी केलीत. म्हणून शिक्षकांचे काम उल्लेखनीय आहे. कार्यकर्तृत्व असेल तर इतिहास होतो. कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आरोग्य व शिक्षण विभागाचे नावाचा उल्लेख होईल, असे म्हणाले. विस्ताराधिकारी सी. डी. सोनवणे म्हणाले की, बऱ्याच शिक्षकांनी उत्कृष्ट काम करूनही त्याचा कामाचा उहापोह होत नाही, म्हणून त्या शिक्षकांना शाबासकीची थाप मिळावी म्हणून त्या शिक्षकांचा गुणगौरव व सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विविध बाबींचा विचार करून आदर्श शिक्षक व विशेष गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला आहे. प्रमुख पाहुणे हिमांशू शाह म्हणाले की, आज आदर्श शिक्षक म्हणून सत्कार झालेल्या शिक्षकांचा आदर्श इतर शिक्षकांनी घ्यावा. रोटरी क्लब राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
शिक्षक संघटनेचे गमन पाटील, गोकुळ सोनार, दीपक निकम, मनोज निकम आदींसह दोंडाईचा, मालपूर गटातील मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.