दोंडाईचा येथे शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST2021-09-06T04:39:50+5:302021-09-06T04:39:50+5:30
दोंडाईचा येथील रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, ...

दोंडाईचा येथे शिक्षकांचा गौरव
दोंडाईचा येथील रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, रोटरी स्कूलचे अध्यक्ष हिमांशू शाह, प्राचार्य एम.पी. पवार, डायटचे शिवाजी ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा व नगरपालिका शाळेतील प्रत्येकी दोन आदर्श शिक्षक, दोन आदर्श शाळांसह १४६ मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अंबादास निकम व सुनील मोरे यांना आदर्श शिक्षक व आदर्श शाळा म्हणून जि.प. शाळा देगाव व दोडाईचा येथील डॉ.अब्दुल कलाम उर्दू स्कूल या शाळांना आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आले. तसेच प्राचार्य डी.एन. जाधव, प्राचार्य आर.डी. वसईकर, प्राचार्या एन.डी. गिरासे, मुख्याध्यापक ए.डी. पाटील, प्राचार्य एम.पी. पवार, मुख्याध्यापक सदाशिव भलकार, शिक्षक अशपाक शेख, ए.एन. पाटील, आर.डी. चौधरी, एन.पी. भिलाने, हितेंद्र राजपूत, अरुण पाटील, विश्वास पाटील, अनिस पठाण, सुरेखा राजपूत, अंशुल कपूर, किशोर घरटे, साधना पाटील, शशिकांत तावडे, संजय कुंभार आदींचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, गटशिक्षणाधिकारी डॉ.सी. के. पाटील, विस्तार अधिकारी सी.डी. सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक संघटनेचे गमन पाटील, गोकुळ सोनार, दीपक निकम, मनोज निकम आदींसह दोंडाईचा व मालपूर गटातील मुख्याध्यापक उपस्थित होते.