गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:19 IST2020-02-10T12:18:40+5:302020-02-10T12:19:16+5:30
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील विविध विद्यालय व महाविद्यालयात बक्षिस वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वाडिले ...

dhule
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील विविध विद्यालय व महाविद्यालयात बक्षिस वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
वाडिले महाविद्यालय
थाळनेर येथील अन्नपूर्णादेवी विद्या प्रसारक संस्था संचलित कै.पितांबर शंकर वाडिले कला महाविद्यालयात बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यापीठ गुणवत्ता यादीत १६३६ विद्यार्थ्यांमधून मराठी या विषयात प्रथम आलेल्या ममता दरबारसिंग जमादार या विद्यार्थिनीचा किसान विद्या प्रसारक संस्थेचे वाडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एल. झुंजारराव यांच्याहस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
तसेच चौथ्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत आलेल्या सलोनी गजेंद्र गुजराथी हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.वाय. जाधव यांनी प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठस्तरीय युवारंगांमध्ये सहभागी झालेल्या वैष्णवी वाघ, विसपुते व अनिल नंदू थोरात यांचा देखील मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र वाडीले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोळी आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेतील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.विजय झुंजारराव यांनी केले.
संत गाडगे महाराज विद्यालयात कार्यक्रम
थाळनेर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित संत गाडगे महाराज विद्यालय व दत्ता पवार कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, जि.प. सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाठ, पं.स. सदस्य विजय बागुल, उपसरपंच आशाबाई वामन कोळी, पत्रकार हेमंत चौधरी, ग्रा.पं. सदस्य भटू शिरसाठ, डोंगर कोळी, उज्वल निकम, रवींद्र कोळी आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य शामकांत ठाकरे यांनी केले. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक विवेक सनेर, व्ही.बी. सोनवणे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.