कुंभार समाजातील गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:11 IST2019-07-29T14:11:34+5:302019-07-29T14:11:50+5:30
यथोचित सन्मान : पाच जणांना समाजभुषण, एकाला जीवन गौरव पुरस्कार प्रदान

कुंभार समाजातील गुणवंतांचा गौरव करताना माजी मंत्री खासदार डॉ़ सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार आदी़
धुळे : खान्देश कुंभार समाज धुळेच्यावतीने खान्देश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्थेतर्फे तेराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासह समाज भूषण आणि जीवन गौरव पुरस्कार वितरीत करण्यात आले़ महिलांना साड्यांचेही वाटप झाले़
शहरातील कल्याण भवनात रविवारी कार्यक्रम पार पडला़ यावेळी माजी मंत्री खासदार डॉ़ सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, महाराष्ट्र कुंभार महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश हिरे, महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतिष दरेकर (पुणे), माजी उपाध्यक्ष रमाकांत क्षिरसागर, उमाजी सूर्यवंशी, संजय जोरले, गणेश मंदिलकर, सुरेश कोते, विश्वास अहेर, धनलाल शिरसाठ, भगवान काळे, हद्येश चव्हाण, सोमनाथ सोनवणे, अशोक वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासह समाजाचा समाज भूषण आणि जीवन गौरव पुरस्काराचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले़ सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ देवून पुणेरी फेटा घालून तुतारी वाजवून पुरस्काराचे वितरण करण्यात आले़
जिल्ह्यातील सुमारे २५० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले़ तर, १०० विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्हे व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला़ धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाष कुंभार, युवा अध्यक्ष किशोर कुंभार, जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शेखर बागुल, उपाध्यक्ष रतिलाल कुंभार, युवा उपाध्यक्ष प्रदीप प्रजापत, जिल्हा सचिव रमेश बहाळकर, सहसचिव सचिन बच्छाव, खजिनदार मोहन प्रजापत, प्रसिध्दी प्रमुख अनिल चित्ते, राजेंद्र चित्ते, प्रविण घाडे, धुळे शहराध्यक्ष शांताराम चव्हाण, धुळे तालुकाध्यक्ष भानुदास वाघ यांच्यासह रामकृष्ण वाघ, युवराज महाले, वसंत कुंभार, श्यामराव वाघ, डी़ डी़ चव्हाण, आनंद बोरसे, गोकूळ कुंभार, अरुण कुंभार, विश्वास कुंभार, काशिनाथ कुंभार, पंकज खैरनार, विजय ठाकरे, विनय ठाकरे, सुरेश जगदाळे, बन्सीलाल मोरे, श्रीराम मोरे, दीपक मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले़