गवळी समाजातील गुणवंताचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:32 IST2019-07-30T21:32:20+5:302019-07-30T21:32:35+5:30

उपक्रम : मान्यवरांनी केले यशस्वीतांचे कौतुक, समाजबांधव उपस्थित

The glory of quality in the Gawali community | गवळी समाजातील गुणवंताचा गौरव

गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह लक्ष्मण दहिहंडे, भगवान गवळी, भालचंद्र हुच्चे, राजेंद्र लगडे, किशोर झारखंडे, अक्षय बहिरवाडे, प्रकाश घुगरे आदी.

धुळे :येथील श्रीसिद्धेश्वर गृप गवळी समाज संघटनेतर्फे लिंगायत गवळी समाजातील दहावी-बारावीतील ११५ गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
मोगलाई, गवळीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या मोगलाई गवळी समाजाचे अध्यक्ष भगवान गवळी (घुगरे) होते. यावेळी  समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दहिहंडे, अक्षय बहिरवाडे (अहमदनगर), राजेंद्र लगडे (दहिवद), अनिल जोमिवाळे  (बोरविहिर), दिलीप हुच्चे (चाळीसगाव), किशोर झारखंडे, प्रकाश घुगरे होते. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक सुनील  गठरी यांनी तर सूत्रसंचालन कैलास पिरनाईक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धेश्वर गृपच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.  यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: The glory of quality in the Gawali community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे