धुळे नगरीत ‘जय परशुराम’ चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:04 IST2018-04-18T15:04:05+5:302018-04-18T15:04:55+5:30
परशुराम जयंती उत्साहात साजरी : पारंपरिक नृत्याविष्काराने वेधले लक्ष

धुळे नगरीत ‘जय परशुराम’ चा जयघोष
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : श्री परशुराम युवा मंचतर्फे बुधवारी सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी पदाधिकाºयांनी ‘जय परषुराम की जय’ असा जयघोष करीत परिसर दुमदुमून सोडला.
रॅलीची सुुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून झाली. शहराती, पेठ विभाग, देवपूर परिसर व मालेगावरोड पर्यंत ही रॅली काढण्यात आली. मालेगावरोडवरील यल्लमा माता मंदिरापर्यंत रॅली आल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी मंदिरात परशुरामांची आरती करण्यात आली. या रॅलीन आदिवासी बांधवांचे गोफ नृत्य सादर करण्यात आले. तसेच भारतीय प्राचीन संस्कृतीचे प्रतिक असलेले मल्लखांबांचे प्रात्यक्षिक व चित्तथरारक कसरती, तसेच महिलांचे लाठी, काठीचे स्वसंरक्षण प्रात्यक्षिक तसेच विविध सांस्कृतिक देखावे व परशुराम भगवानांची प्रतिमा यांचा समावेश होता. शोभायात्रेमुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. या रॅलीत ब्राम्हण समाजाच्या समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीत परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी, मांडवेकर गुरूजी, पुष्कर दीक्षित, प्रसाद देशमुख, हेमेंद्र पंचभाई, पुष्पक जोशी, साहिल दीक्षित, सौरभ जोशी, तुषार पंचभाई, नीलेश गांधलीकर, शुभंकर कुलकर्णी , निखिल जोशी, वैभव देशपांडे, योगेश जोशी, संकेत कुलकर्णी आदी उपस्थित होते.