तुटलेला कठडा देतोय अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:16 IST2020-06-17T22:15:58+5:302020-06-17T22:16:44+5:30
धुळे : महामार्गावर सुरू झाली वाहतूक, कठडा तुटल्याचा फलकही लावण्यात आलेला नाही

dhule
धुळे :तालुक्यातील फागणेजवळ असलेल्या कोंडी नाल्यावरील पुलाचा कठडा तुटला आहे. हा तुटलेला कठडा अपघाताला आमंत्रण देत असून, त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे.
नागपूर-सुरत राष्टÑीय महामार्गावरील धुळ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर फागणे गाव असून, या गावाच्या अलीकडेच कोंडी नाला आहे. या नाल्यावर पूल बांधलेला असून, तो आता जुना झालेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच या पुलाचा कठडा तुटला आहे.
या महामार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. सध्या अनलॉक असले तरी महामार्गावरून धावणाऱ्या महामार्गाची संख्या बºयापैकी आहे. विशेषत: सध्या दुचाकी व लहान चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहेत. पुलावरील कठडा तुटल्याने अपघाताची भीती निर्माण झालेली आहे. कठडा तुटलेल्या ठिकाणी फक्त लाल दोरी लावलेली आहे. कठडा तुटल्याचा सूचना फलकही आसपास लावलेला नाही. रात्रीच्यावेळी कठडा तुटल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दुर्घटना घडण्यापूर्वीच या पुलाची दुरूस्ती करावी.