पाेल्ट्री व्यावसायिक, मांस विक्रेत्यांना पॅकेज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:32 AM2021-03-07T04:32:53+5:302021-03-07T04:32:53+5:30

मुस्लीम ओबीसी खाटीक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीर शेख सरदार यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बर्ड फ्लूमुळे ...

Give packages to poultry professionals, meat sellers | पाेल्ट्री व्यावसायिक, मांस विक्रेत्यांना पॅकेज द्या

पाेल्ट्री व्यावसायिक, मांस विक्रेत्यांना पॅकेज द्या

Next

मुस्लीम ओबीसी खाटीक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीर शेख सरदार यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बर्ड फ्लूमुळे पाेल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान झाले. राज्यात लातूर, काेल्हापूर, साेलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पाेल्ट्रीफार्म व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

पाेल्ट्रीफार्म बंद पडले आहे. त्यामुळे चिकन, मटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चिकन, मटनला असलेली मागणी कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांसह चिकन, मटन विक्रेत्यांना आर्थिक मदतीसह अन्नधान्याची मदत करावी, व्यवसायिकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शब्बीर शेख सरदार खाटीक, करीम अब्दुल न्हावकर, हाजी हुसनाेद्दीन खाटीक, नेहाल अहमद हकीमाेद्दीन खाटीक, वासीम राजा अमानुल्लाह खाटीक, जाकिर हाजी कमराेद्दीन खाटीक, रज्जाक बुऱ्हान खाटीक, मुख्तार शेख गनी, जाहिर शफी खाटीक आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.क

Web Title: Give packages to poultry professionals, meat sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.