युवतीचा मृतदेह ताब्यात द्या

By Admin | Updated: January 8, 2017 23:46 IST2017-01-08T23:46:54+5:302017-01-08T23:46:54+5:30

गूढ मृत्यूप्रकरण : मोलगी येथे सभेत मागणी

Give the body of the girl to the body | युवतीचा मृतदेह ताब्यात द्या

युवतीचा मृतदेह ताब्यात द्या


धडगाव : पुदुच्चेरी येथे गूढ मृत्यू झालेल्या अनिता वसावे या युवतीचा मृतदेह आदिवासी रूढीपरंपरेनुसार अंतिम संस्कार व्हावेत, यासाठी ताब्यात द्या, या मागणीसाठी मोलगी ता़ अक्कलकुवा येथे आदिवासी बांधवांनी सभा घेतली़ या सभेत हजारो समाजबांधव उपस्थित होत़े
यावेळी मयत अनिता वसावे हिला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सभेच्या प्रारंभी मोलगी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला़ यात माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, सातपुडा बचाव आंदोलनचे डॉ़सतीश पाडवी, रवींद्र वळवी, मयत युवतीचे वडील बिज्या वसावे, भरत वसावे, किरण वसावे यांच्यासह हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होत़े
सभेत डॉ़नरेंद्र पाडवी व आमशा पाडवी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल़े मयत अनिता वसावे हिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची एकमुखी मागणी या सभेत करण्यात आली़ (वार्ताहर)

मयत युवती अनिता वसावे हिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयाच्या ताब्यात येत्या पाच फेब्रुवारीर्पयत देण्यात यावा, अशी मागणी या सभेत करण्यात आली़ येत्या पाच फेब्रुवारीर्पयत मृतदेह न मिळाल्यास तीव्र आंदोलन करून गावबंद करण्याचा इशारा सभेत देण्यात आला़ पोलीस प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली़

Web Title: Give the body of the girl to the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.