पाणी भरताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: May 17, 2017 15:43 IST2017-05-17T15:43:12+5:302017-05-17T15:43:12+5:30
विहीरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली

पाणी भरताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 17 - पाणी भरत असताना विहिरीत तोल जाऊन पडल्याने शुभांगी ज्योतीराम भिल (14, रा. धामणगाव, ता. धुळे) या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तालुक्यातील धामणगाव येथील शुभांगी भिल (14) ही मुलगी मंगळवारी सायंकाळी गावाजवळील शेतातील विहीरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली व तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. तिला गंभीर अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.