वाघाडी येथून मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:30+5:302021-05-12T04:37:30+5:30

शनिवारी भरदुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असताना अज्ञात कोणीतरी इसमाने आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना घडली़ याबाबत मुलीच्या ...

Girl abducted from Waghadi | वाघाडी येथून मुलीचे अपहरण

वाघाडी येथून मुलीचे अपहरण

शनिवारी भरदुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असताना अज्ञात कोणीतरी इसमाने आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना घडली़ याबाबत मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

बकऱ्या चोरून नेल्यात

दिनेश खाटीक रा़ आमोदे यांचे गरताड शिवारात गोटफॉर्म असून, तेथून अज्ञात व्यक्तीने १३ बकरे व २ बकरी चोरून नेल्याची घटना १० रोजी भर दुपारच्या सुमारास घडली़ ४५ हजार रुपये किमतीच्या त्या बकऱ्या होत्या़ याबाबत थाळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

गळफासने मृत्यू

वाघाडी येथील ४५ वर्षीय महिला छायाबाई खासेराव पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० रोजी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली़ जेठ विश्वासराव सीताराम पाटील यांनी त्या महिलेला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ़ नितीन निकम यांनी तपासून मयत घोषित केले़

Web Title: Girl abducted from Waghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.