जिल्ह्यातील जिनिंग उद्योगाने घेतली भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:36 IST2020-06-11T15:33:41+5:302020-06-11T15:36:24+5:30

कोरोनामुळे बसला फटका : लॉकडाऊनमुळे दीड महिन्यापासून बंद असलेली कापूस खरेदी सीसीआयमुळे पुन्हा सुरु

The ginning industry in the district took off | जिल्ह्यातील जिनिंग उद्योगाने घेतली भरारी

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कापूस हे आंतरराष्टÑीय उत्पादन आहे. परंतू कोरोनामुळे आंतरराष्टÑीय मार्केटमध्ये कापसाच्या गाठीना कमी भाव मिळत असल्याने जिनिंग उद्योग आर्थिक अडचणीत सापडला होता.त्यामुळे दीड महिन्यापासून कापसाची खरेदी ठप्प होती. परंतू सीसीआय किंवा मार्केटींग फेडरेशनने दिलेल्या पाठबळामुळे जिनिंग उद्योग पुन्हा सुरु झाला. जिल्ह्यात सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरु झाली आहे.
सध्या स्थितीत जिल्ह्यात धुळे सूतगिरणी, शिरपूर सूतगिरणी आणि शिंदखेडा तालुक्यात खाजगी तीन जिनिंग सुरु आहेत. त्यात शिंदखेडा येथील केशरानंद जिनिंगमध्ये १ लाख १५ हजार क्विंटल आणि वर्धमान आणि अभिषेक जिनिंगमध्ये १३० हजार क्विंटल तर धुळे सुतगिरणीत २० हजार तर शिरपूरमध्ये ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
३ लाख क्विंटल कापूस शिल्लक - कापूस खरेदी उशिरा सुरु झाल्याने जिल्ह्यात आणखी ३ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे. दोंडाईचा मार्केटमध्ये ६ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आपली नावे नोंदविली आहेत. त्यात १८०० शेतकºयांचा माल मोजला गेला आहे. आंतरराष्टÑीय मार्केटमध्ये कापसाला ४५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तर सीसीआयचे प्रति क्विंटल ५११० ते ५३५५ रुपयापर्यंत भाव आहे.
गुरुवारपासून शिंदखेडा तालुक्यातील केशरानंद कोटेक्स येथेही सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरु होत आहे.
शिरपूर तालुका - लॉकडाऊनमुळे शासनाने सीसीआयला कापूस खरेदीची परवानगी दिल्यामुळे शिरपूर-चोपडा मार्गावरील दहिवद फाट्याजवळील डी़आरक़ॉटन येथे दररोज ४० ते ५० वाहनांची मोजमाप सोशल डिस्टन्स राखत खरेदी करण्यात आली़ तत्पूर्वी, शेतकºयांनी येथील मार्केट कमिटीत नाव नोंदणी केली होती़ आतापर्यंत १ हजार ७९८ शेतकºयांनी नोंदणी केली होती़ मात्र प्रत्यक्षात ७०० शेतकºयांचा कापूस देखील खरेदी करण्यात आलेला नाही़ त्यामुळे नोंदणी केलेल्या हजारावर शेतकºयांकडे अद्यापही कापूस पडून आहे़
११ नोव्हेंबर २०१९ ते ३ मार्च २०२० दरम्यान येथील डी़आरक़ॉटन येथे ७३ हजार ९०७ क्विंटलची तर लॉकडाऊन काळात म्हणजेच ५ मे ते ६ जून २०२० दरम्यान १८ हजार ४२५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे़ या कालावधीत फक्त ७०० शेतकºयांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे़ कापसाला ५ हजार २१७ ते ५ हजार ३५५ भाव दिला आहे़ मात्र ६ जूननंतर काही तांत्रिक अडचणींमुळे कापूस खरेदी प्रशासनाने बंद केली आहे़
आतापर्यंत या कॉटन जिनिंगला ९२ हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी करण्यात आला आहे़ या जिनिंगला कापूस ठेवण्यासाठी शेड नसल्यामुळे उघड्यावर ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला आहे़ मात्र निसर्ग वादळ येण्याच्या आदल्यादिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेकडो क्विंटल कापूस ओला झाला़ त्यामुळे सद्यस्थितीत तेथील कामगार कापसाचे ढिकारे मोकळे करून कापूस सुकविण्याचे काम करीत आहेत़
दोंडाईचा - दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा माध्यमातून सी सी आय ने कापूस खरेदी सुरू केली आहे. परंतु कोरोनाचा संसगार्तून लागलेली संचारबंदी-टाळेबंदीत परप्रांतातील मजूर स्वगृही गेल्यामुळे कापूस पासून रुई व सरकी काढण्याचे काम थंडावले आहे. खरेदी झालेल्या कापसाचा गाठी,रुई व सरकी हा प्रश्न दोडाईचातील जिनिगला व प्रशासनाला पडला आहे.
दोडाईचा बाजार समिती मार्फत भारतीय कपास निगम कापूस खरेदी करीत आहे. ४ मे पासून दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग, बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग, शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंग या तिन्ही ठिकाणी कापूस खरेदी केंद्र आहे. दोंडाईचा बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील ६४०० शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी नोंद केली आहे. परंतु सुमारे ३० ते ३५ टक्के कापूस अजून घरातच पडून आहे.पावसाळा सुरू झाला तरी अद्याप शेतक?्यांचा घरातच कापूस पडून असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
शिंदखेडा तालुक्यात सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू आहे. शासनाने तिन्ही जिनिग मार्फत कापसापासून रुई,कापसाचा गाठी व सरकी काढण्याचे काम होते.
साधारणत: कापूस जिनिग चे काम एप्रिल महिन्या पावेतो आटोपून जाते.परंतु कोरोना मुळे खरेदी लांबली,तसेच जिनिग चे पण काम सुरू आहे. जिनिग चे काम अजून कमीत कमी दोन महिने चालेल असा अंदाज आहे.

Web Title: The ginning industry in the district took off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे