स्वच्छ भारत अभियानात अव्वल स्थान मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:04 IST2019-06-02T23:03:50+5:302019-06-02T23:04:09+5:30
चंद्रकांत सोनार : राजश्री शाहू नाट्य मंदिरात कार्यशाळेत आवाहन

dhule
धुळे : धुळ मुक्त करण्याकरिता े पदाधिकारी व प्रशासन एकत्रित प्रयत्न करीत असल्याने यश मिळत आहे़ येणाऱ्या काळात देखील स्वच्छ भारत अभियानात अव्वल स्थान मिळवा, त्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले़
राजश्री छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात रविवारी सकाळी कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, आयुक्त सुधाकर देशमुख, युवराज पाटील, चंद्रकांत जाधव, लक्ष्मन पाटील आदी उपस्थित होते़ स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाºया विविध घटकांसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे़ घंटागाडी मधील कचरा संकलन करताना ओला व सुका वेगवेगळा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी माहिती़ महापौर सोनार यांनी दिली़ कंपनीमार्फत प्रशिक्षण शंतनु बोरसे यांनी घरस्तरावर जाऊन घंटागाडी ओला व सुका कचरा नागरिकांकडून कोणत्या प्रकारे घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले़ विठ्ठल गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना सांगितले गाड्यांचा वेग कमी ठेवावा जेणेकरून अपघात होणार नाही. कर्मचाºयांनी नागरिकांना पत्रके देऊन जनजागृती करावी़ कार्यशाळेचे प्रास्ताविक साळवे यांनी केले.
कंपनीने प्रामाणिक पणे काम करावे : आयुक्त
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये धुळे शहर पहिल्या वीस मध्ये यायला हवे त्यादृष्टीने कंपनीने शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे काम अचूक कसे होईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. प्रत्येक कर्मचाºयाने प्रभागात जावून ओला व सुका कचरा हा वेगवेगळा घ्यायला हवा. कंपनीचे काम हे पाच वषार्पेक्षा जास्त कसे चालेल यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले़