रस्ता होईना, आगरपाड्यात लालपरी जाईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:41 AM2019-02-24T11:41:00+5:302019-02-24T11:41:26+5:30

राज्य परिवहन महामंडळ। ठेलारी बांधवांचा पाडा, प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थांची नाराजी

Get out of the street, go crazy! | रस्ता होईना, आगरपाड्यात लालपरी जाईना!

रस्ता होईना, आगरपाड्यात लालपरी जाईना!

Next

संडे हटके बातमी
गणेश जैन । 
लोकमत न्यूज नेटवर्क 
बळसाणे :  साक्री तालुक्यातील आगरपाडा हे लहानसे गाव म्हणजे ठेलारी बांधवांचा पाडा़ ‘गाव तेथे रस्ता’ आणि ‘रस्ता तेथे एसटी’ या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाची एसटी धावते़ परंतु आगरपाडा या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील लोकांचे अतोनात हाल होतांना दिसून येत आहेत़ शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध, आजारी रुग्ण, प्रसुतीसाठी जाणाºया महिलांना तर जीव मुठीत घेऊन अंतर कापावे लागते, अशी वाईट स्थिती असूनही आजपर्यंत या गावात ‘लालपरी’ अर्थात एसटी पोहचली नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली़
कढरे ते आगरपाडा व बळसाणे पर्यंत रस्ता तयार असून या रस्त्यावरून एखादी तरी बस सुरू व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे़ आगरपाडा ते कढरे यादरम्यान रस्ता वाहतूकीस खराब असल्याने आणि कढरे गावापासून साधारणत: ५ ते ६ किमी पायी चालत यावे लागते़ तसेच बळसाणे व कढरे या दोन्ही गावात बसेससह खासगी वाहनांची नियमितपणे वर्दळ राहते़ कदाचित आगरपाडा गावाकडे जाण्याच्या रस्तेत सुधारणा राहिली असती तर येथील एसटी बसेस ही आगरपाड्यापर्यंत पोहचली असती तर तेथील लोकांनी ही लालपरीवर प्रवास करण्याचा आनंद घेतला असता़ खराब अशा रस्त्यांमुळे या गावाला आजही एसटीची सेवा पोहचलेली नाही़ एसटी व कुठल्याही प्रकाराचे खासगी वाहन येत नसल्याने तेथील रहिवाशांना मोटरसायकल व बैलगाडीचा वापर करुन बळसाणे अथवा कढरे गावापर्यंत पोहचून एसटीचा पुढील प्रवास करावा लागत असल्याचे ठेलारी बांधवांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
  आगरपाडा हे माळमाथा परिसरातील १०० ते १२५ घरांचे गाव आहे़ गावातील जवळपास १५ ते २० मुल , मुली शिक्षणांसाठी कढरे या गावी पायी जातात़ 
उन, वारा सहन करुन पाच ते सहा किमी पायीचा प्रवास शाळेच्या दिवशी विद्यार्थ्यांना रोजच करावा लागतो़ या गावात खासगी वाहतुकीचे कोणतेही साधन नाही़ या गावातील रहिवाशांना तसेच विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने राज्य परिवहन महामंडळाचा ‘गाव तेथे एसटी’ या संकल्पनेला तडा जात आहे़ अशा अनेक समस्यांनी आगरपाडा हे गाव ग्रासलेले आहे़ तसेच गावाच्या विकासाकडे प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आहे़ 
नवस फेडण्यासाठी होतेय गर्दी
४आगरपाड्याच्या पायथ्याशी जोगेबा देवस्थान असून याठिकाणी पोळ्याच्या दुसºया दिवशी मोठी यात्रा भरते़ खान्देशभरातून भाविक नवस फेडण्यासाठी गर्दी करतात़ रस्त्याअभावी भाविकांना जोगेबा देवस्थान गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सोसावा लागत असल्याचे भाविकांकडून सांगितले जाते़ 
खराब रस्त्याची अशी ही दैना
आगरपाड्यात जाण्यासाठी कढरे या गावांपासून साधारणपणे ५ ते ६ किमीचा रस्ता असून हा रस्ता पूर्णत: खराब झालेला आहे़ याठिकाणी पायी चालणे देखील अशक्य आहे़ पावसाळ्यात तर चिखल तुडवीत ग्रामस्थांना हा रस्ता पार करावा लागतो़ रस्त्यांअभावी अपघाताला ही आमंत्रण येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अपघाताच्या आमंत्रणाला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करुन आगरपाड्याच्या रहिवाशांना रस्ता तयार करुन एखादीतरी लालपरी अर्थात एसटीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली आहे़ याकडे साक्री तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याची वस्तुस्थिती आहे़ 

Web Title: Get out of the street, go crazy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे