अभ्यासक्रमातून जगण्याची दिशा मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:22 IST2020-03-07T22:22:08+5:302020-03-07T22:22:29+5:30

संडे अँकर । विद्यावर्धिनी महाविद्यालयात हिंदी पाठ्यक्रम निर्धारण कार्यशाळा

Get directions for living through the course | अभ्यासक्रमातून जगण्याची दिशा मिळावी

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लोकशाहीमध्ये ज्या पध्दतीने पारदर्शीपणा आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आता अभ्यासक्रमातही पारदर्शीपणा असावा़ तसेच रोजगाराभिमुख भाषा व साहित्य असावे, ज्यात विद्यार्थ्यांना जगण्याची दिशा मिळावी़ त्यांना सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी़ भाषा ही आता अडथळा असू नये, असे मत हिंदी साहित्य अकादमी मुंबईचे माजी अध्यक्ष डॉ़ शितला प्रसाद दुबे यांनी मांडले़
कवयित्रि बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हिंदी अध्ययन मंडळ आणि विद्यावर्धिनी महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी पाठ्यक्रम निर्धारण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ़ शुभदा ठाकरे होत्या़ व्यासपीठावर विद्यापीठाचे मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ़ प्रमोद पवार, माजी प्राचार्य डॉ़ कृष्णा पोतदार, हिंदी गझल समीक्षक डॉ़ मधु खराटे, हिंदी अध्ययन मंडळाचे अध्यक्ष डॉ़ सुनील कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ़ जिजाबराव पाटील, अधिसभा सदस्य गौतम कुवर आदी मान्यवर उपस्थित होते़
यावेळी हिंदी अध्ययन मंडळाच्या सदस्या डॉ़ कामिनी तिवारी यांच्या गझलकार चंद्रसेन विराट या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दोन सत्रामध्ये झालेल्या या कार्यशाळेत दुपारच्या सत्रात डॉ़ संजय शर्मा , डॉ़ सुनील पाटील, डॉ़ आऱ के़ जाधव, डॉ़ संजय रणखांबे, डॉ़ जयश्री गावीत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ अध्यक्षस्थानी डॉ़ सुनील कुलकर्णी आदी होते़
खान्देशातील प्राध्यापकांचा सहभाग
या कार्यशाळेत धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील उमवीच्या ५० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला़ वर्तमान परिस्थितीत उपयोगी पडेल असा अभ्यासक्रम असावा़, असे मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक डॉ़ योगेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन डॉ़ जयश्री गावीत यांनी केले़ डॉ़ मंजु तरडेजा यांनी आभार मानले़

Web Title: Get directions for living through the course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे