शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

धुळ्यात चोरीच्या १७ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:55 PM

बाभुळवाडीतून तिघे ताब्यात : साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देचोरीच्या १७ दुचाकीची किंमत ८ लाख ४० हजारधुळे तालुक्यातील बाभुळवाडी येथून ३ जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाने चोरीला गेलेल्या १७ दुचाकी शोधून काढल्या आहेत़ त्याची एकत्रित ८ लाख ४० हजार इतकी किंमत आहे़ याप्रकरणी धुळे तालुक्यातील बाभुळवाडी येथून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले़ चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला १२ सप्टेंबर रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार नोंदविण्यात आली होती़ तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांनी शोध पथकाला तपासाचे आदेश दिले होते़ त्यानुसार, शोध पथकातील कर्मचाºयांना २० सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना शैलेश दादाभाऊ पाटील (२४, रा़ बाभुळवाडी ता़ धुळे) हा संशयितरित्या फिरताना आढळला़ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ एमएच १८ एएस ०३८६ क्रमांकाची मोटारसायकलही चोरीची निघाल्याने पोलिसांचा संशय बळावला़ शिवाय या कामी अजय उर्फ बंटी गोपीचंद पाटील (२३) आणि राकेश उर्फ भुºया अर्जुन पाटील (२७) या दोघा साथीदारांची नावे समोर आली़ त्यांनाही संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ या तिघांच्या टोळीने विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली़ मिळालेल्या माहितीच्या आधारावर चाळीसगाव रोड पोलिसांनी चोरीच्या १७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत़ त्याची एकत्रित किंमत ८ लाख ४० हजार इतकी आहे़ या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी निघण्याची शक्यता आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, पोलीस कर्मचारी संदिप कढरे, जोएब पठाण, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे, संदिप खैरनार, हेमंत पवार, शंकर महाजन यांनी ही कामगिरी केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी